Thursday, July 28, 2011

कोट्या नु कोटी

नव्यानेच केल्यात वाटा म्हणाले
जुन्याला आता द्या फाटा म्हणाले

घड्याळात नाहीत काटे तरीही
वेळेस काढू काटा म्हणाले

कुणाचे कुणाशी पटेना तरीही
बळानेच वाटू पाटा म्हणाले

न मलई न लोणी आहे फक्त पाणी
तरी फार झालाय घाटा म्हणाले

नको चळवळी अन् नको ते उठाव
ब-या वाटती याच लाटा म्हणाले

ही कुलुपे नि किल्ल्या ती भिंती नि दारे
चौकी तरी पास थाटा म्हणाले

असे शब्द भारी तरीही सुचेना
करप्टेड आहे डाटा म्हणाले

कुठे चालले एवढ्या दूर लोक?
घरातील संपलाय आटा म्हणाले

अन्याय माझे कोट्या नु कोटी
आता पाय याचेच चाटा म्हणाले

Monday, July 04, 2011

पुन्हा केव्हातरी !

काळजाच्या ठोक्यावर चालणारे

घड्याळ म्हणते;

मलाही काही मर्यादा आहेत.


स्पेशल इफेक्ट देऊन

झपझप उलटणारी कॅलेंडरची पाने म्हणतात;

काळजी नको, आम्ही आहोतच.

तुम्ही असला नसलात तरी


माझी शून्यात गेलेली

आरशातली नजर म्हणते;

जाऊ देत ... पुन्हा केव्हातरी !

पुन्हा जन्म मिळतोच म्हणे

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...