मरून
गेले झाड तरीही कळले नाही
कोणाचेही
अश्रू तेथे ढळले नाही
गर्द
सावली होती तेव्हा होती गर्दी
झडून
गेल्यावरी कुणी चुकचुकले नाही
नुकते
नुकते आले होते वयात ते तर
पाणी
कोठे मुरते त्याला कळले नाही
वळवाचा
हा पाउस घेऊन आला वारा
आज
किती वर्षातून ते थरथरले नाही
नका
नका हो तेच तेच ते खोड उगाळू
जुनेच
आहे तेही अजुनी जळले नाही
सुंदर!
ReplyDelete